Tuesday, 13 April 2010

आयुष्य खुप सुंदर आहे.

आयुष्य खुप सुंदर आहे.

(२०१० या वर्षातील जानेवारी महिन्याच्या पहिल्या २० दिवसातच महाराष्ट्रातील २५ - ३० विद्यार्थ्यांनी आत्महत्ये सारखे निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, आजहि हे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.
माझ्या विद्यार्थी मित्रांना आयुष्याचे महत्व समजावुन सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.)

आयुष्य एक फुल आहे
गंध तयाचे होऊन बघ,
पाकळ्यां वरुन ओघळणारे
थेंब दवबिंदुचे होऊन बघ.

चांदण्यांचे कोडे सोडविणारा
चंद्र नभातला होऊन बघ,
प्रत्येक संकटावर मात करशील
फक्त धाडशी योद्धा होऊन बघ.

हार-जीत तर होतच रहाते
दोहोंची चव चाकुन बघ,
अपयशाला पायरी करुन
यशाचे शिखर चडुन बघ.

एका अपयशातच निर्णय कसला?
तु डाव दुसरा मांडुन बघ,
आयुष्याचा डाव सोडुन जाण्यापुर्वी
एकदा आई-बाबांकडे वळुन बघ.

आयुष्य खुप सुंदर आहे
तु चारी दिशा निरखुन बघ,
लढण्यासाठी आयुष्य एकदाच मिळते
शेवटच्या क्षणापर्यंत लढुन बघ.

No comments:

Post a Comment