Tuesday, 13 April 2010

फकत माझ्या साठी

कत माझ्या साठी


मला समजुन घ्यायच आहे ते प्रत्येक वाक्य,
ज्याचा अर्थ कोणी समजू शकले नाही.

मला धावायचं आहे त्या प्रत्येक वाटेवरून,
जय वाटेवर कोणी साधं चालूही शकले नाही.

मला चढायचं आहे त्या शिखरावर,
ज्याची उंची कोणीहि जाणु शकले नाही.

मला अनुभवायचं आहे ते प्रत्येक दूःखं,
ज्या दूःखाचे कोणी कधी कल्पनाहि करू शकले नाही.

पण खरतर आज
मला जगायचं आहे ते प्रत्येक क्षण,
जे क्षण मी स्वतः जगू शकलो नाही।
क्षण, जे माझ्या साठी होते,
फक्त माझ्या साठी...

प्रवास....

प्रवास....

फक्त एकदाच तुला भेटायचय,
ओझरता का होईना
पुन्हा एकदा तुझा सहवास अनुभवायचय.

पुर्ण आयुष्यासाठि नाहि तर काहि क्षणांसाठि ये,
त्या काहि क्षणांमध्ये मला पुर्ण आयुष्य जगायचय.

तुझ्या विरहात मनात खुप दु:खं साठलय,
तुझ्या कुशीत येउन एकदा मनमोकळ रडायचय.

कित्येक दिवस अबोल राहिले हे मन,
तुझ्याशी या मनाला खुप काहि बोलायचय.

मान्य आहे तु आलीस तरी परत जाणार,
पण तरीहि तुला थांबवण्याचा एकदा प्रयत्न करायचय.

ज्या स्वप्नासाठि प्रवास सुरु केले,
ते स्वप्न तर अपुर्णच राहिले.
थकलेल्या या मनाला आता परतीच्या प्रवासाला जायचय,
पण त्यापुर्वी तुल एकदा मन भरुन पहायचय.

फक्त एकदाच,
येशील ना.........?

आयुष्य खुप सुंदर आहे.

आयुष्य खुप सुंदर आहे.

(२०१० या वर्षातील जानेवारी महिन्याच्या पहिल्या २० दिवसातच महाराष्ट्रातील २५ - ३० विद्यार्थ्यांनी आत्महत्ये सारखे निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, आजहि हे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.
माझ्या विद्यार्थी मित्रांना आयुष्याचे महत्व समजावुन सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.)

आयुष्य एक फुल आहे
गंध तयाचे होऊन बघ,
पाकळ्यां वरुन ओघळणारे
थेंब दवबिंदुचे होऊन बघ.

चांदण्यांचे कोडे सोडविणारा
चंद्र नभातला होऊन बघ,
प्रत्येक संकटावर मात करशील
फक्त धाडशी योद्धा होऊन बघ.

हार-जीत तर होतच रहाते
दोहोंची चव चाकुन बघ,
अपयशाला पायरी करुन
यशाचे शिखर चडुन बघ.

एका अपयशातच निर्णय कसला?
तु डाव दुसरा मांडुन बघ,
आयुष्याचा डाव सोडुन जाण्यापुर्वी
एकदा आई-बाबांकडे वळुन बघ.

आयुष्य खुप सुंदर आहे
तु चारी दिशा निरखुन बघ,
लढण्यासाठी आयुष्य एकदाच मिळते
शेवटच्या क्षणापर्यंत लढुन बघ.

कॉफी....

कॉफी....

नजर माझे भिडलेले
तिझ्या मधिर नजरेशी,
तिझ्या सोबत ति पहिली वेळ
कॉफीचे कप होते ओठाशी.

नभ हि त्यावेळी भरुन गेले
जणू प्रेमाच्या सप्तरंगानी,
कॉफी चे गरम घोट घेऊनहि
झोंबत होते गार वारा अंगाशी.

मनात एक इच्छा दाटली
तिला बाहूत घेण्याची,
मग मनच का भांडत होते
त्या हरपलेल्या इच्छेशी.

तिझे बोलके नजर
साद घालत होते माझ्या नजरेला,
जणू फुलाला काहितरी बोलायचे होते
त्या दरवळणार्‍या गंधाशी.

अविस्मरणीय क्षण ते आयुष्यातील
ओढ वाढवत होते प्रेमाची,
तिझ्या बरोबर ति पहिली वेळ
कॉफीचे कप होते ओठाशी.....

प्रेम...............गरज, रहस्य कि स्वप्न ?



प्रेम...............गरज, रहस्य कि स्वप्न ?

गरज होते प्रेमाचे,
तरुणाईच्या वाटेवर चालण्याचे,
रोजच्या जिवना पेक्षा
वेगळे जिवन जगण्याचे.

रहस्य होते प्रेमाचे,
प्रयत्न होते ते उलघडण्याचे,
आवड काय आणि गरज काय?
यातील फरक जाणण्याचे.

स्वप्न होते प्रेमाचे,
स्वप्नात तिला भेटण्याचे,
नेहमि तिझ्याच सोबति राहण्यासाठी
दिर्घ झोपी जाण्याचे...................